Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताचे फेसबुक पेज झाले व्हेरिफाइड

By admin | Updated: April 1, 2017 04:55 IST

मुक्ता बर्वे फेसबुकवर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे फेसबुकला अकाऊंट असून, यात चार हजारांहून

मुक्ता बर्वे फेसबुकवर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे फेसबुकला अकाऊंट असून, यात चार हजारांहून अधिक फ्रेंड्स आहेत. तसेच सत्तर हजारांहून अधिक जण तिच्या या अकाऊंटला फॉलो करतात. या अकाऊंटवर ती तिचे वैयक्तिक फोटो तर पोस्ट करत असतेच पण त्याचसोबत तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी नेहमीच माहिती देत असते. तसेच आपल्या फॅन्ससोबत सतत संपर्कात राहण्यासाठी तिने मुक्ता बर्वे हे पेजदेखील बनवले आहे. या पेजद्वारे ती तिच्या फॅन्ससोबत नेहमीच गप्पागोष्टी करत असते. तसेच ती फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तिच्या फॅन्सशी गप्पा मारत असते. तिचे हे फेसबुक पेज नुकतेच व्हेरिफाइड करण्यात आले आहे. फेसबुककडून पेज व्हेरिफाइड झाल्यानंतर मुक्ताने लगेचच याबाबतची पोस्ट तिच्या पेजवर टाकली आहे. त्या वेळी तिने टाकलेल्या स्मायलीमधून तिला झालेला आनंद दिसून येत आहे. तिच्या फेसबुक पेजला 98000हून अधिक लोकांनी आतापर्यंत लाइक केले आहे.