Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिअर वाचवण्यासाठी विवेक ओबेरॉयने धरला 'बाहुबली'चा हात

By admin | Updated: March 6, 2017 13:08 IST

बॉलीवुडमध्ये सिनेमे मिळत नसल्याने अभिनेता विवेक ओबेरॉय दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीकडे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - बॉलीवुडमध्ये सिनेमे मिळत नसल्याने अभिनेता विवेक ओबेरॉय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळताना दिसत आहे. 'बाहुबली' फेम प्रभाससोबत तो एका सिनेमात काम करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. 
 
या सिनेमात विवेक व्हिलनच्या भूमिकेत दिसेल. सिनेमाच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आली नसली तरी हा बिग बजेट सिनेमा असणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमातील एका एक्शन सीनसाठी तब्बल 35 कोटी रूपये खर्च येणार असल्याची माहिती आहे. तर सिनेमाचं संपूर्ण बजेट 150 कोटी असणार आहे.    
 
विवेक ओबेरॉयशिवाय या सिनेमात नील नितीन मुकेश आणि जॅकी श्रॉफ हे कलाकारही असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.