Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४ किलो वजन घटलं, अग्निहोत्रींना आश्चर्य वाटलं! म्हणाले, "हेल्थ एक्सपर्ट.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 14:28 IST

केजरीवालांचं तुरुंगवासात ४ किलो वजन घटलं, या गोष्टीवर विवेक अग्निहोत्रींनी केजरीवालांना टोमणा मारलाय. काय म्हणाले अग्निहोत्री? बघा

'द काश्मिर फाईल्स' फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री कायम त्यांच्या विविध विधानांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. विवेक अग्निहोत्री सतत राजकीय आणि सामाजिक घडामोडींबद्दल सोशल मीडियावर चर्चेत असतात. विवेक यांनी नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टोमणा मारलाय. अरविंद केजरीवाल यांचं तुरुंगात जाऊन साडेचार किलो वजन कमी झालं असल्याचं सांगण्यात येतंय. यावर विवेक अग्निहोत्रींनी केजरीवालांना टोमणा मारलाय.

विवेक अग्निहोत्री यांनी एका वृत्तवाहिनीच्या बातमीचा फोटो शेअर करत लिहिलंय की, "अगदी कमी दिवसांत साडेचार किलो वजन कमी होण्याची काय शक्यता आहे. आरोग्य तज्ञांनी प्रकाश टाकावा. मला ती रेसिपी हवी आहे." असं लिहित विवेक अग्निहोत्रींनी अरविंद केजरीवालांना टोमणा मारलाय. विवेक यांच्या या विधानावर अनेकांनी त्यांना समर्थन दिलं असून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली. अरविंद केजरीवाल किती दिवस तुरुंगात राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :विवेक रंजन अग्निहोत्रीअरविंद केजरीवालदिल्ली