Join us

‘& जरा हटके’ टीमची ‘लोकमत’ आॅफिसला भेट

By admin | Updated: July 22, 2016 02:07 IST

‘& जरा हटके’ चित्रपटाची कथा आई-मुलगी आणि वडील- मुलगा यांच्या नात्याभोवती फिरते.

‘& जरा हटके’ चित्रपटाची कथा आई-मुलगी आणि वडील- मुलगा यांच्या नात्याभोवती फिरते. आई आणि वडील मध्यमवयात पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतात. या दोघांनाही मुलं आहेत. त्यामुळे या दोघांची मुलं यांच्या नात्याला कितपत आणि कसं स्वीकारतात, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले आहे. दोन पिढ्यांमधील जनरेशन गॅप, आई-मुलगी, वडील-मुलगा यांच्यातील हेवेदावे अगदी संवेदनशील पद्धतीने या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न प्रकाश कुंटे यांनी केला असल्याचे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ आॅफिस भेटीदरम्यान सांगितले. या वेळी सिद्धार्थ मेनन, शिवानी रांगोळे आदी उपस्थित होते. नटरंग, बालक-पालक आणि टाइमपास यासारखे दर्जेदार चित्रपट देणारे रवी जाधव हे दिग्दर्शक. आपल्या प्रत्येक चित्रपटाचे प्रमोशन त्यांनी अगदी हटके पद्धतीने केले आहे. मग तो बालक-पालक असो किंवा टाइमपास, त्यासाठी त्यांनी वापरलेली प्रमोशन क्लृप्ती वाखाणण्याजोगी होती, तर इरॉस इंटरनॅशनल ही चित्रपट निर्मितीतली आघाडीची निर्मिती संस्था आहे. इरॉस इंटरनॅशनलने आतापर्यंत अनेक नावाजलेले सिनेमे हिंदी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. रवी जाधव आणि इरॉस इंटरनॅशल या दोघांची निर्मिती असलेला ‘& जरा हटके’ चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संदीप खरे आणि मंगेश कांगणे यांच्या गीतांना आदित्य बेडेकर यांनी संगीत दिले आहे. शैल हाडा, हमसिका अय्यर आणि शाशा तिरुपती यांनी सिनेमातील गाण्यांना स्वरबद्ध केले आहे. मयूर हरदास यांनी सिनेमाचे संकलन केले असून, वासुदेव राणे यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. मृणाल कुलकर्णी, इंद्रनील सेनगुप्ता, सिद्धार्थ मेनन, शिवानी रांगोळे, सुहास जोशी, सोनाली खरे, स्पृहा जोशी यांच्या भूमिका आपल्याला या सिनेमात पाहायला मिळतील.