Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर

By admin | Updated: October 13, 2015 15:55 IST

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा प्रतिष्ठित विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाला असून ५ नोव्हेंबर रोजी सांगलीमध्ये अभिनेत्री फैय्याज यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. १३ - ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा प्रतिष्ठित विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाला असून ५ नोव्हेंबर रोजी सांगलीमध्ये अभिनेत्री फैय्याज यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती पुरस्कार निवड समितीच्या अधिका-यांनी दिली. 
चित्रपट व नाटक क्षेत्रातील विक्रम गोखले यांच्या योगदानाचा विचार करून त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. विष्णूदास भावे पदक आणि ११ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक जब्बार पटेल, नाटककार महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.