Join us
Daily Top 2Weekly Top 5

विशाल-जगदीशची जमली जोडी

By admin | Updated: April 7, 2017 02:14 IST

विशाल-जगदीश यांच्या जोडीने आतापर्यंत अनेक मालिकेच्या शीर्षकगीतांना, चित्रपटांना संगीतच दिले नाही तर ही गीते त्यांनी लिहिलीदेखील आहेत.

विशाल-जगदीश यांच्या जोडीने आतापर्यंत अनेक मालिकेच्या शीर्षकगीतांना, चित्रपटांना संगीतच दिले नाही तर ही गीते त्यांनी लिहिलीदेखील आहेत. ही जोडी आता फुलपाखरू या मालिकेचे शीर्षकगीत घेऊन येत आहे. या मालिकेचे शीर्षकगीत विशाल आणि जगदीश यांनी लिहिले असून त्याला संगीतदेखील त्यांनी दिले आहे आणि त्याचसोबत या मालिकेमध्ये काही गीते प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. याविषयी विशाल सांगतो, पूर्वी केवळ मालिकांचे शीर्षकगीत असायचे. पण आता मालिकेच्या भागांमध्येदेखील दृश्यानुरूप आपल्याला गीते पाहायला मिळतात. त्यामुळे एक गीतकार, संगीतकार म्हणून आम्हाला अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. फुलपाखरू या मालिकेत प्रेक्षकांना एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे या मालिकेचे शीर्षकगीत खूपच छान आहे. तसेच मालिकेत आणखी तीन गीतांचा समावेश असणार आहे. काही ठरावीक भागांनंतर मालिकेमध्ये गाणे असावे असे या मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे. त्यामुळे ही मालिका म्हणजे रसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. यासोबतच हे दोघे सध्या डोंबारी या चित्रपटावर काम करत आहते. गावराण बाजाचा हा चित्रपट असून या चित्रपटातील सगळी गाणी ते दोघेच लिहिणार असून त्यांना संगीतदेखील ते देणार आहेत.