Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट-अनुष्का वृंदावनात पोहोचले, प्रेमानंद महारांजाचे घेतले आशीर्वाद, पहाटे ६ वाजता गाठला आश्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:50 IST

विराट आणि अनुष्का एखाद्या सामान्य भक्ताप्रमाणे जमिनीवर बसून महाराजांचं मोलाचं प्रवचन ऐकताना पाहायला मिळाले.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी-अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा वृंदावनमध्ये पोहचले आहेत. आज मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं.  प्रेमानंद महाराजांच्या आशीर्वादासाठी हे स्टार दांपत्य पहाटे ६ वाजता त्यांच्या आश्रमात पोहोचले.

विराट आणि अनुष्का एखाद्या सामान्य भक्ताप्रमाणे जमिनीवर बसून महाराजांचं मोलाचं प्रवचन ऐकताना पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी महाराजांशी आध्यात्मिक विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोघे सोमवारी संध्याकाळी उशिरा वृंदावनात दाखल झाले होते. हा संपूर्ण दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ते स्थानिक रेडिसन हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले होते. चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी त्यांनी पहाटेची वेळ भेटीसाठी निवडली.

विशेष म्हणजे, प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाची त्यांची ही पहिली वेळ नाही. गेल्या तीन वर्षांतील विराट आणि अनुष्काची प्रेमानंद महाराजांसोबतची ही चौथी भेट आहे. विराट आणि अनुष्का यांच्या भेटीचा सिलसिला जानेवारी २०२३ पासून सुरू झाला. विशेष म्हणजे, मे २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विराटने महाराजांचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी, म्हणजेच डिसेंबर २०२५ मध्येही हे दांपत्य वृंदावनात आले होते.  वृंदावन येथे प्रेमानंद महाराजांचं आश्रम आहे. लाखो भाविक त्यांना फॉलो करतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Virat Kohli and Anushka Sharma Seek Blessings in Vrindavan

Web Summary : Virat Kohli and Anushka Sharma visited Vrindavan to seek blessings from Premanand Maharaj. This marks their fourth visit in three years. They listened to his teachings and discussed spiritual matters, maintaining a low profile during their stay.
टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली