माझा होशील ना ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रेक्षकांची खूपच चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेची कथा प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेतील नायक आणि नायिका दोघे देखील प्रेक्षकांना भावत आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीची तर चांगलीच चर्चा रंगली आहे. या मालिकेतील नायक विराजस कुलकर्णी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले होते.
विराजस सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या फोटोत आपल्याला विराजससोबत त्याची आई म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना पाहायला मिळत आहे. मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलाच्या मालिकेच्या सेटला अचानक भेट दिली होती. अचानक मिळालेल्या या सरप्राईजमुळे विराजला प्रचंड आनंद झालेला असल्याचे त्यांच्या पोस्टमधून कळून येत आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून 29 हजाराहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.
विराजस आणि शिवानी रांगोळे यांच्या अफेअरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली आहे. विराजस आणि शिवानीची ओळख एका नाटकादरम्यान झाली होती. शिवानीने विराजसच्या 'डावीकडून चौथी बिल्डिंग' या नाटकात काम केलं होत. तेव्हापासून त्या दोघांची ओळख झाली होती. शिवानी सध्या 'सांग तू आहेस ना' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या व्यतिरिक्त शिवानीने ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकेत बाबासाहेबांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे.