Join us

शाहरूखनंतर, 'विमल गर्ल' सौंदर्या शर्मा 'हाऊसफुल ५' मध्ये अक्षय कुमारसह दिसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 21:08 IST

Soundarya Sharma : सौंदर्या शर्मा हिचा 'बिग बॉस'मधील प्रवासही अविस्मरणीय आहे.

बॉलिवूडची 'हॉट अँड ब्युटीफुल' अभिनेत्री सौंदर्या शर्मा हिने डेंटिस्टचे शिक्षण संपादित करून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. ती यापूर्वी किंग खान शाहरूखसोबत एका जाहिरातीत झळकली आहे. 

सौंदर्या शर्मा हिचा 'बिग बॉस'मधील प्रवासही अविस्मरणीय आहे. सौंदर्याच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५' चित्रपटात सौंदर्या शर्मा हिची महत्त्वाच्या भूमिकेत एंट्री झाली आहे.

कलाकारांचा ताफा 'हाऊसफुल ५' या आगामी बिग बजेट चित्रपटात मुख्य भूमिकेत अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, संजय दत्त, फरदीन खान, जॅकलिन फर्नाडिस, सौंदर्या शर्मा, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, दिनो मोरिया, चित्रांगदा हे कलाकार दिसतील. 

चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत लंडनमध्ये सुरू राहणार आहे. तसेच मुंबईत डिसेंबरपर्यंत हे शूटिंग फिल्म सिटीत होणार आहे. पुढील वर्षी ६ जून २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

टॅग्स :सौंदर्या शर्मासिनेमाबॉलिवूड