Join us

VD12च्या हिंदी टीझरसाठी रणबीर कपूरचा आवाज, विजय देवरकोंडा आभार मानत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:12 IST

विजय देवरकोंडाने रणबीर कपूरचं केलं कौतुक

अभिनेता विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) आगामी VD 12 सिनेमाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. या सिनेमाच्या तमिळ, तेलुगु आणि हिंदी टीझरसाठी दोन दिग्गज अभिनेत्यांनी आवाज दिला आहे. ज्युनिअर एनटीआने तेलुगू, रणबीर कपूरने हिंदी तर अभिनेता सूर्याने तमिळ मधील टीझरसाठी आवाज दिला आहे. यासाठी विजयने दोघांचेही आभार मानले आहेत. आज सिनेमाचा टीझर रिलीज होणार आहे. विजयने सोशल मीडियावर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.

विजयने इन्स्टाग्राम स्टोरीवर ज्युनिअर एनटीआरसोबत (JrNTR) फोटो शेअर करत लिहिले,"कालचा बहुतांश दिवस त्याच्यासोबत घालवला. आयुष्य, काळ, सिनेमा विषयी गप्पा मारल्या. खूप हसलोही...टीझरचं डबिंग केलं. माझ्यासारखाच तोही यासाठी आतुर होता. अण्णा आजच्या दिवसासाठी खूप आभार."

दुसऱ्या स्टोरीत विजयने सूर्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले, "मी अण्णाचा किती मोठा चाहता आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. कित्येक वर्ष मी त्याचं काम बघत आलो आहे. जितकं मी त्याला ओळखतो तो पॉवरहाऊस अभिनेता आहे. तेवढाच मृदूही आहे. मला माहित होतं की तो मला नाही म्हणणार नाही त्यामुळे मी त्याला टीझरला आवाज देण्यासाठी विचारण्याआधीच मी त्याला नाही म्हणण्याची विनंती केली. पण तरी तो म्हणालाच. लव्ह यू ना."

रणबीरचा अॅनिमल मधील फोटो शेअर करत विजयने लिहिले, "रणबीर, जेव्हापासून मी माझ्या आवडत्या अभिनेत्यांची यादी काढली त्यात तुझं नाव नेहमीच राहिलं आहे. मी त्याला टीझरसाठी आवाज देण्यासाठी विचारणार तितक्यात माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने होकार दिला. माझ्या आवडत्या आवाजासह मी सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी खूप आतुर आहे. आरके तुझे आभार, खूप प्रेम."

VD 12 सिनेमाचं दिग्दर्शन गौतम टिन्ननुरी यांनी केलं आहे. सिनेमाचा टीझर आज रिलीज होत आहे. तसंच सिनेमाचं अधिकृत टायटलही आज समोर येईल. सिनेमात श्रीलीला मुख्य अभिनेत्री आहे. यावर्षी मे महिन्यात सिनेमा रिलीज होणार आहे.

टॅग्स :विजय देवरकोंडारणबीर कपूरबॉलिवूड