Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता विद्युत जामवालने अदा शर्मासोबतच्या रिलेशनशीपबाबत केला 'हा' खुलासा म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 13:25 IST

विद्युतचे नाव त्याची सहकलाकार अदा शर्मासोबत जोडण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल सध्या त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. विद्युतचे नाव त्याची सहकलाकार अदा शर्मासोबत जोडण्यात आले आहे. अभिनेत्याने सांगितले की, 'कमांडो 3'मधील त्याची सहकलाकार अदा शर्मा फक्त त्याची मैत्रिण नाही आहे. विद्युतला एका ट्विटर यूजरने विचारले, 'तुझ्यात आणि अदा शर्मामध्ये फक्त मैत्रिचे नातं आहे का?' यावर उत्तर देताना विद्युत म्हणाला,  फक्त मित्र 'अजिबातच नाही .. आम्ही धैर्यवान, दयाळू, अंतर्ज्ञानी, केंद्रित, उत्तम, मुक्त मनाचे, साधे, विचारशील,  सुशिक्षित, आनंदी, शांत आणि उत्तम मित्र आहोत.

हे आदाच्या पोस्टनंतर आले आहे ज्यात त्याने लिहिले आहे की, "मेरे टेड टॉक. मला सांग तुला काय वाटते. मी आत्ता फ्रि आहे आणि मी तुमच्या सर्व यूट्यूबवरील कमेंट्ससुद्दा वाचणार आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला. अदाचे  कौतुक करीत विद्युतने इतर लोकांनाही ते पाहण्यास सांगितले आणि लिहिले, "व्यक्तिशः माझी निवड आहे ... स्पष्ट आणि मजेदार, मी नक्कीच बघणार आहे."

विद्युत लवकरच रोमाँटिक सिनेमात 'खुदा हाफिज'मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा एका खऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर  आधारित आहे, जो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत असतो. 2009 मध्ये आलेल्या मंदी दरम्यान दोघे लग्न करतात.   

टॅग्स :विद्युत जामवालअदा शर्मा