भगवान आबाजी पालव म्हणजेच आपले भगवान दादा यांच्या जीवनपटावर असलेल्या या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. कारण, या चित्रपटामध्ये बॉलीवूडची तगडी अभिनेत्री विद्या बालन ‘एक अलबेला’च्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करीत आहे. तसेच, शोला जो भडके दिल मेरा धडके...दर्द जवानी का सताये भरभरके.. म्हणत सगळ्यांनाच साध्या सरळ नृत्याकडे आकर्षित करणाऱ्या भगवान दादांच्या जीवनावर असलेला चित्रपट गेले कित्येक दिवस विविध कारणांनी चर्चेत आहे. भगवान दादांची भूमिका मंगेश देसाई साकारत आहे. त्यांनी आत्मसात केलेला भगवान दादांचा लूक, अभिनय आणि त्यांची नृत्यशैली याची चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू आहे. हा चित्रपट शेखर सरतांडेल यांनी दिग्दर्शित केला असून, १० जूनला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
विद्याचा ‘एक अलबेला’ जूनमध्ये
By admin | Updated: May 1, 2016 02:09 IST