Join us  

Video: तृप्ती तोरडमलचा फॅट टू फिट प्रवास, तृप्तीचा वर्कआऊ व्हिडीओ तुम्हालाही प्रेरणा देईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 8:00 AM

अनेक सेलिब्रिटी मंडळी फिटनेसवर विशेष लक्ष देतात. तासनतास जिममध्ये घालवत किंवा घरच्या घरी व्यायाम अथवा योगासन करत ते स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात.

कलाकार मंडळी मोठ्या निष्ठेने आपल्या वाट्याला आलेली भूमिका साकारत त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. तासनतास शुटिंग आणि कामाचं दडपण तसंच दगदग यांत स्वतःला फिट ठेवणं हीसुद्धा काळाची गरज आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी मंडळी फिटनेसवर विशेष लक्ष देतात. तासनतास जिममध्ये घालवत किंवा घरच्या घरी व्यायाम अथवा योगासन करत ते स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. या कलाकारांमध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव घ्यावे लागेल.

तृप्ती तोरडमल असं या अभिनेत्रीचे नाव आहे. आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातून अभिनेत्री तृप्ती तोरडमल हिने फॅन्स आणि समीक्षकाची मनं जिंकली. स्वप्ना जोशी यांच्या सविता दामोदर परांजपे या सिनेमातून ती रसिकांच्या भेटीला आली. सुबोध भावेसह ती रुपेरी पडद्यावर झळकली. अभिनयाने रसिकांवर जादू करणारी तृप्ती फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग आहे. 

फॅट टू फिट असा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. नुकतंच तिने तिच्या वर्कआऊटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यांत ती फुफ्फुसासंदर्भातील व्यायाम करताना पाहायला मिळत आहे. तिचा हा व्यायाम तुम्हालाही नक्कीच प्रेरणा देईल. या व्हिडीओला तिने सुंदर आणि तितकीच आकर्षक अशी कॅप्शनही दिली आहे. रोम काही एका दिवसात उभं राहिलेलं नाही, ते उभं करण्यासाठी त्यांनी एक एक दिवस घाम गाळला आहे. 

मुलांनीही आपला वारसा चालवावा असं सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही वाटत असतं. आपल्या आई-वडीलांचा वारसा चालवत जेव्हा मुलं त्यांचं नाव मोठं करतात, तेव्हा आई-वडीलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल हे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील खूप मोठं नाव. त्यांची मुलगी तृप्ती तोरडमल आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री बनली आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाद्वारे तृ्प्तीने अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.

टॅग्स :तृप्ती तोरडमलसविता दामोदर परांजपे