Join us

Video : प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा बोल्ड व्हिडीओमुळे आली चर्चेत, होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 13:20 IST

Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत पाहायला मिळते आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) सध्या माझी तुझी रेशीमगाठ (Mazi Tuzi Reshimgath) मालिकेत पाहायला मिळते आहे. या मालिकेत तिने साकारलेली नेहा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. प्रार्थना मालिकेशिवाय सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वी प्रार्थना सोशल मीडियावरील बोल्ड व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. या व्हिडीओवरुन तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. दरम्यान आता पुन्हा प्रार्थना बेहरे बोल्ड व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत हार्ट इमोजी शेअर केली आहे. या व्हिडीओत पर्पल रंगाचा जंपसूट परिधान केला आहे. यात ती क्लीवेज शो ऑफ करताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. तिचे चाहते तिच्या या फोटोशूटची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

प्रार्थना बेहरेने आपल्या कारकीर्दीची सुरुवात टेलिव्हिजनवरुन म्हणजेच 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून केली. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी चित्रपटात एन्ट्री मारत रसिकांची मनं जिंकली. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का या मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच ती छुमंतर या मराठी सिनेमातही झळकणार आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरे