Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- पूनम पांडेकडून चाहत्यांना होळीच्या सेक्सी शुभेच्छा!

By admin | Updated: March 14, 2017 18:40 IST

बॉलिवूड क्वीन पूनम पांडेनी स्वतःच्या चाहत्यांनी होळीच्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूड क्वीन पूनम पांडेनी स्वतःच्या चाहत्यांना होळीच्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. होळीच्या निमित्तानं एक हॉट व्हिडीओ तिनं इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. त्या व्हिडीओमध्ये पूनम पांडे सेक्सी लूकमध्ये होळी खेळताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पूनम पांडे होळीनिमित्त चाहत्यांना काही तरी हॉट गिफ्ट देणार असल्याची चर्चा होती. अखेर हॉट अंदाजात तिनं चाहत्यांसाठी होळी खेळतानाचा सेक्सी व्हिडीओ अपलोड केल्यानंतर तो वा-यासारखा पसरला आहे. या व्हिडीओनं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातली आहे. पहिल्यांदा पूनम पांडेनं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला. त्यानंतर तो वा-यासारखा पसरला आहे. बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडे हिने नेहमीच्या अंदाजात तिच्या फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशात कुठलेही निमित्त असो, त्यावर पूनम पांडे चाहत्यांना खास अंदाजात व्हिडीओच्या माध्यमातून गिफ्ट देत असते. असेच व्हिडीओ गिफ्ट तिने होळीच्या निमित्तानेही दिले असून, यामध्ये ती जबरदस्त हॉट दिसत आहे.पूनमने ट्विटरवर या व्हिडीओची लिंक शेअर करताना लिहिले की, माझ्याकडून तुमच्यासाठी एक छोटेसे गिफ्ट. पूनमच्या या लिंकला तिच्या चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ यू ट्युबवर शेअर होताच सोशल मीडियावर वा-यासारखा व्हायरल झाला आहे. काही वेळामध्येच व्हिडीओ बघणा-यांची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे. व्हिडीओमध्ये पूनम रंगांसोबत सेक्सी हावभाव करताना पाहायला मिळत आहे. बिकिनी घातलेल्या पूनमच्या या व्हिडीओने सध्या धूम उडवून दिली आहे. खरं तर पूनम नेहमीच अशा प्रकारचे व्हिडीओ शेअर करून तिच्या चाहत्यांना धक्का देत असते. आता पूनमने दिलेल्या या होळीच्या शुभेच्छा तिच्या चाहत्यांना भावल्या नसतील तरच नवल म्हणायचे.