Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या "बाबूमुशाय बंदूकबाज" सिनेमाचं टीझर रिलीज

By admin | Updated: June 9, 2017 14:43 IST

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी सिनेमा ""बाबूमुशाय बंदूकबाज"" चं टीझर रिलीज करण्यात आलं आहे

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 9 - बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी सिनेमा ""बाबूमुशाय बंदूकबाज"" चं टीझर शुक्रवारी (9 जून) रिलीज करण्यात आलं आहे. टीझर व्हिडीओ नवाजुद्दीन सिद्दीकीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअरदेखील केला आहे. 
 
सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी एका वाया गेलेल्या, बेजबाबदार व्यक्तीची भूमिका साकारत आहे. जो मद्यसेवन करणं, भांडणं, हाणामारी करणं आणि देहविक्री करणा-या महिलांकडे जाणं, अशा वाईट सवयींचा आहारी गेला आहे. दरम्यान, या सिनेमातही नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या दमदार अभिनयाचे प्रदर्शन करणार हे टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. 
 
या सिनेमाचे दिग्दर्शन कुशान नंदी यांनी केले आहे. सिनेमात नवाजसोबत ताहिर भसीनदेखील दिसणार आहे. याआधी ताहिर "फोर्स-2" या सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर आला होता. कुशान हे प्रसिद्ध निर्माते प्रीतीश नंदी यांचे पुत्र आहेत. खरंतर हा सिनेमा 2016 रिलीज करण्यात येणार होता. मात्र काही कारणांमुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. मात्र सिनेमा बॉक्सऑफिसवर कधी झळकणार याची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.