Join us

VIDEO : माधुरी बनली वरुण-आलियाची डान्सगुरू

By admin | Updated: February 10, 2017 14:10 IST

'तम्मातम्मा -2' हे गाणं अखेर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 -  माधुरी दीक्षितने वरुण-आलियाला शिकवलेले 'तम्मातम्मा -2' हे गाणं अखेर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने 'तम्मातम्मा - 2' गाणं तुमच्या भेटीला घेऊन येत आहे, असे सोशल मीडियावर सांगितले होते. त्यानुसार शनिवारी 'तम्मातम्मा 2' हे गाणं प्रसिद्ध करण्यात आले.
 
रिलीज करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये माधुरी आलिया भट्ट आणि वरुण धवनला 'थानेदार' सिनेमातील 'तम्मातम्मा' गाण्यावरील स्टेप्स शिकवत असल्याचे पाहायला मिळत आहे. वरुण-आलियाने त्या स्टेप्स शिकून माधुरीची शाब्बासकीही मिळवली. एकूणच काही मिनिटांसाठी माधुरी या दोघांच्या डान्सगुरूच्या भूमिकेत होती. 
 
माधुरीसोबत धम्मालमस्ती केलेला व्हिडीओ वरुणनं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअरही केला आहे. 1989 साली आलेला 'थानेदार' या सिनेमातील तम्मातम्मा हे मूळ गाणं असून 'बद्रीनाथ की दुल्हनिया' सिनेमाच्या माध्यमातून आलिया-वरुण हे गाणं पुन्हा एकदा सिनेरसिकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. थानेदार या सिनेमात 'तम्मा-तम्मा' हे गाणं माधुर दीक्षितवर चित्रित करण्यात आले होते.  
 
दरम्यान, 'बद्रीनाथ की दुल्हनिया' हा सिनेमा येत्या 10 मार्चरोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाचे रिलीज करण्यात आलेले टायटल ट्रॅक साँग आतापर्यंत 1 कोटींहून अधिक जणांनी पाहिले आहे. 
 

थानेदारमधील तम्मा तम्मा गाणंही पाहा...