ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा "राबता"चा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा या सिनेमाचा रिलीज करण्यात आलेला ट्रेलर रोमाँटिक संवादांनी भरलेला आहे. ट्रेलरमध्ये अॅक्शनही पाहायला मिळत आहे.
सुशांत आणि कृतीनं सिनेमाचा ट्रेलर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यानंतर पहिल्या तीन तासांत 2 लाख हून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिलादेखील. हा सिनेमा 9 जून रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
कृती आणि सुशांतची फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकवर्गात कमालीच उत्सुकता निर्माण झाली आहे, विशेष करुन युवावर्गात.
या सिनेमाचं शुटिंग 2015मध्ये सुरू करण्यात आले होते.