Join us

VIDEO: वाढदिवसाचा मुहूर्त साधत कतरिना कैफची फेसबूकवर एंट्री

By admin | Updated: July 16, 2016 14:31 IST

वाढदिवसाचा मुहूर्त साधत कतरिना कैफने लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबूक'वर पदार्पण करत एक व्हिडीओही शेअर केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेली कतरिना कैफचा आज वाढदिवस.. इतर सेलिब्रिटी सोशल मीडियावर सैदव अॅक्टिव्ह असताना कतरिना मात्र या सर्व माध्यमांपासून चार हात लांब रहाणेच पसंत करत असे. मात्र आज वाढदिवसाचा मुहूर्त साधत कतरिनाने लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबूक'वर पदार्पण केले आहे. एवढेच नव्हे तर तिच्या आलिशान घरातील एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना बर्थडेचे सरप्राईजही दिले. 
 
(बर्थडे गर्ल कतरिनाबद्दल या '१०' गोष्टी माहीत आहेत का?)

दरम्यान कतरिनावे तिचा वाढदिवस कटुंबिय व काही खास मित्रांसोबत साजरा केला. या  पार्टीसाठी आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य कपूर, कबीर बेदी, रेशमा शेट्टी आणि अली अब्बास जफर उपस्थित होते. मात्र या सेलिब्रेशनसाठी तिचा एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूरला आमंत्रण दिले नव्हते. 

कतरिनाचा लौकरच बार-बार देखोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत जग्गा जासूसमध्येही झळकणार आहे.