Join us

VIDEO : शाहिद, सैफ आणि कंगनाच्या 'रंगून'चा बोल्ड ट्रेलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2017 11:51 IST

विशाल भारद्वाज यांचा आगामी रोमॅन्टिक ड्रामा सिनेमा 'रंगून'चा ट्रेलर रिजीज करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - विशाल भारद्वाज यांचा आगामी रोमॅन्टिक ड्रामा सिनेमा 'रंगून'चा ट्रेलर रिजीज करण्यात आला आहे. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा या सिनेमामध्ये शाहिद कपूर आणि सैफ अली खान एकत्र दिसणार आहेत. या दोघांनाही एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.  
 
सिनेमाची कहाणी 1940 मधील दुस-या महायुद्धाच्या दरम्यानची आहे. ट्रेलर रिलीज करण्यात आला असला तरी सिनेनिर्मात्यांनी सिनेमाचे गूढ कायम ठेवण्याचा पुरेपुरे प्रयत्न केला आहे. 
 
सैफ अली खान, कंगना राणावत आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर असून यात युद्धसोबत प्रेमकहाणीही पाहायला मिळणार आहे.  
शाहिद कपूर एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसत असून कंगना स्टंटवुमनची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत आणखी उत्सुकता ताणली गेली आहे. हा सिनेमा 24 फेब्रुवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.