Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : 'बिग बॉस' फेम सई लोकूर आणि तीर्थदीप रॉयच्या लग्नाचा व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 15:42 IST

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूरचं तीर्थदीप रॉयच्या या लग्न सोहळ्याची झलक व्हिडीओतून पहायला मिळत आहे.

लग्न म्हणजे प्रत्येकासाठी एक उत्सव असतो. सणसमारंभात जशी मजा, उत्साह असतो तसाच लग्नातही असतो आणि प्रत्येकाला तो थाटामाटात साजरा करायचा असतो. तो करण्यासाठीचं माध्यम म्हणजे लग्नसोहळ्यातल्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूरचं तीर्थदीप रॉयसोबत दोन पद्धतीनं लग्न पार पडलं. ते म्हणजे महाराष्ट्रीयन आणि बंगाली पद्धतीनं. तिच्या या लग्ना सोहळ्याची झलक तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओतून पहायला मिळाली.

सई लोकूरने शेअर केलेल्या व्हिडीओत ती आणि तीर्थदीप रॉय रोमँटिक अंदाजात पहायला मिळत आहेत. सईचं लग्न बेळगावमध्ये ३० नोव्हेंबरला मोठ्या थाटामाटात पार पडलं. व्हिडीओची सुरूवात लग्न मंडपापासून होते. तिथल्या प्रत्येक सोहळ्यांसाठी केलेले डेकोरेशन पहायला मिळते आहे. त्यानंतर एन्ट्री होते ती नवरीची म्हणजेच आपल्या लाडक्या सईची. मराठमोळ्या अंदाजात सई खूपच गोड दिसते आहे. त्यानंतर तिच्यासोबत रोमांस करताना तीर्थदीप दिसतो आहे. मग वर-वधूची हळद, मेहंदी, संगीत सोहळ्यापर्यंतचे सर्व क्षण या व्हिडीओत पहायला मिळत आहेत. तीर्थदीप आणि सईच्या रोमँटिक डान्ससोबतच कुटुंबातील सदस्यांच्या डान्सची झलकही पहायला मिळाली.

 या सोहळ्यानंतर महाराष्ट्रीयन आणि बंगाली पद्धतीत पार पडलं सई लोकूर आणि तीर्थदीप रॉयचं लग्न. यावेळी या दोघांचा रोमँटिक अंदाज घायाळ करणारा असा होता.

सईने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.  तीर्थदीपशी लग्न केल्यानंतर आता सई सासरी चांगलीच रुळली आहे. बंगाली संस्कृती, तिथले रितीरिवाज फॉलो करताना ती दिसते आहे.   

टॅग्स :सई लोकूरबिग बॉस मराठी