Join us

VIDEO : बाहुबली 2 चा ट्रेलर रिलीज

By admin | Updated: March 16, 2017 10:23 IST

एस.एस.राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'बाहुबली-2 द कंक्ल्यूजन'चा ट्रेलर अखेर रिलीज करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 -  एस.एस.राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'बाहुबली-2 द कंक्ल्यूजन'चा ट्रेलर अखेर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. 
याआधी होळीच्या दिवशी ट्रेलरचा प्री-लूक व्हिडीओ रिलीज करण्यात आला होता. 12 सेकंदांचा हा व्हिडीओ बाहुबलीच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर टाकण्यात आला आहे. 
 
 
'बाहुबली' या सिनेमाने भारतीय सिनेजगतात कमाईचा नवा इतिहास रचला. दोन वर्षांपासून सिनेमाच्या दुस-या भागाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, बाहुबलीचा दुसरा भाग भारतीय सिनेजगतात आणखी नवा इतिहास रचणार असंच वाटतंय. कारणंही तसंच आहे, या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच 500 कोटी रूपयांची कमाई केली आहे.
(बाहुबलीला का मारलं, अखेर कटप्पानंच केला खुलासा)
 
सॅटेलाइट्स राइट्सच्या माध्यमातून बाहुबली-2 ने 500 कोटी रूपये कमावले आहेत.  बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर हा सिनेमा हिंदीत प्रदर्शित करणार असून यासाठी करणच्या धर्मा प्रोडक्शनने याचे अधिकार 120 कोटींना विकत घेतले आहेत. 28 एप्रिलला हा सिनेमा 4 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  
 
प्रभाष, राणा डग्‍गुबती स्टारर 'बाहुबली-2' बाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेला प्रश्न 'कटप्‍पा ने बाहुबली को क्‍यों मारा?' याचं उत्तरही मिळणार आहे.