Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO:वरुण आणि आलियाच्या 'बद्रीनाथ की दुल्हनिया' चा ट्रेलर रिलीज

By admin | Updated: February 2, 2017 18:37 IST

2 मिनट 57 सेकंदांचा हा ट्रेलर 1990 चा सिनेमा 'थानेदार' मधील गाणं 'तम्मा तम्मा' च्या मिक्स व्हर्जनसह सुरू होतो. आलिया आणि वरूणची जोडी पर्फेक्ट मॅच होत असून दोघांची केमिस्ट्रीही नॅचरल

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा सिनेमा 'बद्रीनाथ की दुल्हनिया' चा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला.  यामध्ये वरुण धवन आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.  'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' नंतर पुन्हा एकदा ही जोडी सर्वांचं मनोरंजन करायला सज्ज आहे.  
 
2 मिनट 57 सेकंदांचा हा ट्रेलर 1990 चा सिनेमा 'थानेदार' मधील गाणं 'तम्मा तम्मा' च्या मिक्स व्हर्जनसह सुरू होतो. आलिया आणि वरूणची जोडी पर्फेक्ट मॅच होत असून दोघांची केमिस्ट्रीही नॅचरल दिसते. ट्रेलर पाहून हा एक मसाला एंटरटेनर सिनेमा असणार आहे हे कळतं.  शशांक खेतान यांनी दिग्दर्शीत केलेला हा सिनेमा 10 मार्चला प्रदर्शित होणार आहे.