Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पाठक बाई उर्फ अक्षया देवधरने सोशल मीडियावर शेअर केला डान्सचा व्हिडीओ, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 15:57 IST

अक्षयाने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. आपले विचार तसंच स्वतःचे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिला सोशल मीडियावर बरेच फॅन फॉलोईंग आहे. नुकतेच अक्षयाने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, या तो दोस्ती गहरी है... की हा व्हिडीओ थ्रीडी आहे. 

या व्हिडीओत अक्षया आणि तिच्या मैत्रिणी दिल चाहता है सिनेमातील हम है नये, अंदाज क्यूं हो पुराना या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. या व्हिडीओला लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

अक्षया देवधर हिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली. अक्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. पाठक बाई म्हणून अक्षया घराघरात पोहोचली.

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत पाठकबाई बनलेली अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात पहायला मिळाली.  या भूमिकेतून तिने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली आहेत. 

टॅग्स :अक्षया देवधरतुझ्यात जीव रंगला