Join us

VIDEO - झिंगाटनंतर अजय-अतुलचं हे गाणं तुम्हाला याड लावणारं

By admin | Updated: September 18, 2016 15:10 IST

झिंगाटनंतर आता अजय-अतुल त्याच पठडीतील बेबी ब्रिंग इट ऑन हे गाणं घेऊन आले आहेत. दिग्दर्शक गिरीष कुलकर्णी यांच्या जाऊंदयाना बाळासाहेब या सिनेमातील हे गाणं आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ : सैराट चित्रपटातील सर्वंच गाण्यांनी प्रेक्षकांना याड लावलं होतं. चित्रपटाच्या सर्वच गाण्यांची झिंग अजून उतरली नाही. गणपतीच्या मिरवणूकित तर संपूर्ण राज्यात लोक झिंगाट झाले होते. सैराटमधील गाण्याने गायक, संगीतकार अजय-अतुल यांनी चाहत्यांना ठेका धरायला लावला.  
 
झिंगाटनंतर आता अजय-अतुल त्याच पठडीतील बेबी ब्रिंग इट ऑन हे गाणं घेऊन आले आहेत. दिग्दर्शक गिरीष कुलकर्णी यांच्या 'जाऊंद्याना बाळासाहेब' या सिनेमातील हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. गाण्याचं संगीत, बोल याडं लावणार आहे. बघ तरी गोडीत, लक्झरी गाडीत आलोया मै हू डॉन, बेबी ब्रिंग इट ऑन, आलिंगनाला असे या गाण्याचे बोल आहेत.
 
हे गाणं अजय-अतुलने लिहिलं असून, या गाण्याला त्यांनीच संगीत दिलं आहे, तर अजय गोगावलेने हे गायलं आहे. ७ ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता भाऊ कदम, गिरीष कुलकर्णी, सई ताम्हणकर, मोहन जोशी, मनवा नाईक प्रमुख भूमिकेत आहेत.