Join us
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या अभिनेत्री

By admin | Updated: March 16, 2015 00:00 IST

रश्मी देसाई- उतरन या मालिकेमुळे ओळख झालेले रश्मी व नंदीश एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २०१२ साली लग्नगाठीत अडकले. मात्र ...

रश्मी देसाई- उतरन या मालिकेमुळे ओळख झालेले रश्मी व नंदीश एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २०१२ साली लग्नगाठीत अडकले. मात्र दोन वर्षांतच त्यांच्यादरम्यान खटके उडू लागले आणि रश्मी घर सोडून वेगळी रहायला लागली. रश्मीला शारीरिक छळाल सामोरे जावे लागल्यामुळे ती बाहेर पडली असे वृत्त होते. मात्र या वर्षाच्या सुरूवातीस ती व नंदीश पुन्हा एकत्र आले असून सध्या त्यांच्यात सर्व आलबेल असल्याचे समजते.

रुचा गुजराती- टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अबिनेत्री रुचा गुजराती हिने २०१० साली तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न केले खरे मात्र दोन वर्षांतच ते दोघे वेगळे झाले. पैशासांठी सासरच्यांनी छळ केला तसेच आपल्यावर व आपल्या वडिलावंर हल्ला केल्याचे सांगत तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. रुचा या विषयावर नेहमीच मौन बाळगून होती मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिला अनेकवेळा उपाशीही ठेवण्यात येत असे अखेर .या छळाला कंटाळून तिने वेगळं व्हायचा निर्णय घेतला. सध्या या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे.

श्वेता तिवारी- कसोटी जिंदगी की या मालिकेमुळे घराघरांत पोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारीलाही पती राजा चौधरीकडून कौटुंबिक हिंसा व शारीरिक छळ सहन करावा लागला होता. त्या दोघांचे लग्न १९९८ साली झाले होते आणि त्यांना पलक नावाची एक मुलगीही आहे. पण श्वेताच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे राजाला असुरक्षित वाटू लागले. तो अनेकवेळा श्वेताच्या सेटवर जाऊन गोंधळ माजवत असे आणि तिचे पैसेही हिसकावत असे. ब-याच काळासाठी हा त्रास सहन केल्यानंतर श्वेताने २००७ साली घटस्फोटासाठी अर्ज केला.

युक्ता मुखी- माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री युक्ता मुखी हिनेही तिचा पती प्रिन्स तुली याच्याविरोधात पोलिसांत कौटुंबिक हिंसा व लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. तुली आपल्याला नेहमी शिव्या देत असे व मारहाण करत असे तिने आपल्या तक्रारीत म्हटले होते. अखेर गेल्या वर्षी ती पतीपासून विभक्त झाली

झीनत अमान- आपला फॅशन सेन्स आणि पडद्यावरील ड्रॅमॅटिक भूमिकांमुळे सदैव चर्चेत राहणा-या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांचे खरे आयुष्यही तसेच ड्रॅमॅटिक होते. झीनत अमान यांना त्यांचा मित्र (आणि तथाकथित नवरा) संजय खान यांनी भर पार्टीत मारहाण केल्याचे वृत्त होते. त्यानंतर अमान यांनी मझहर खान यांच्याशी लग्न केले मात्र तेव्हाही त्यांना अशाच छळाला सामोरे जावे लागले.

शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेत्री रती अग्निहोत्री यांनी पतीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर महिलांवरील अत्याचाराचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. पती अनिल विरवानी यांनी आपला हुंड्यासाठी छळ करत मारहाण व अश्लिल शिवीगाळ केल्याचे रती अग्निहोत्री यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. रती यांच्याप्रमाणेच अनेक अभिनेत्रीही अशा छळाच्या शिकार बनल्या आहेत.