Join us

OMG- या अभिनेत्रीवर होते विकी कौशलचे फर्स्ट क्रश, आज ती आहे दोन मुलांची आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 14:08 IST

कलाकार आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असतात.

कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कलाकारांपासूव सर्वसामान्य व्यक्ती सध्या घरातच क्वारांटाईन झाले आहे. कलाकार आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असतात. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसुद्धा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. विकी कौशलने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी संवाद साधला. यादरम्यान विकीने बॉलिवूडमधील त्याच्या फर्स्ट क्रश माधुरी दीक्षित असल्याचे सांगितले.   

विकीने बुधवारी इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या चाहत्यांसाठी क्वीज सेशनचे आयोजन केले होते. यादरम्यान एक यूजरने विकीला त्याचे बॉलिवूडमध्ये पहिलं क्रश कोण आहे?, असा प्रश्न विचारला.  याप्रश्नासोबत विकीने आपल्या अॅप स्टोरीवर माधुरीसोबतचा फोटो शेअर केला. 

विकीने पीएम केअर फंडला एक कोटी डोनेट केले आहे. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर उरीचा दिग्दर्शक आदित्य धरसोबत विकी पुन्हा एकदा काम करणार आहे. 'अश्वत्थामा'वर सिनेमा तयार करत आहेत. यात विकी गुरू द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामाचीच भूमिका साकारणार आहे. . तो इज्राइल मार्शल आर्ट आणि जपानी मार्शल आर्ट्स शिकणार आहे. तसेच सिनेमात रॉयल लूक येण्यासाठी तो तलवारबाजी आणि तिरंदाजीचे प्रशिक्षणसुद्धा घेणार आहे.

टॅग्स :विकी कौशलमाधुरी दिक्षित