Join us

ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा दिसणार नव्या भूमिकेत

By admin | Updated: October 12, 2015 17:32 IST

आगामी 'उड्नछू' हा चित्रपट येत असून यामध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा एका 'बाबा'च्या भूमिकेत दिसून येणार आहेत. 'उड्नछू'चे पोस्टर प्रदर्शित करण्यात असून यात प्रेम चोप्रा यांच्यासोबतच

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - हिंदी चित्रपट सृष्टीत खलनायकाच्या भूमिकेने नावाजलेले ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आता परत आपल्याला एका चित्रपटांमधून दिसणार आहेत. मात्र आता ते खलनायकाच्या भूमिकेत नव्हे तर एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 
आगामी 'उड्नछू' हा चित्रपट येत असून यामध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा एका 'बाबा'च्या भूमिकेत दिसून येणार आहेत. 'उड्नछू'चे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून यात प्रेम चोप्रा यांच्यासोबतच अभिनेत्री ब्रुना अब्दुल्ला दिसत आहे. 
या चित्रपटाविषयी काही गोष्टी आत्ता उघड करणे  योग्य नाही, पण हा चित्रपट एक वेगळ्या प्रकारचा असून हा एका गोल्ड मॅन आणि बाबांवर आहे. तसेच चित्रपटातील आशय वेगळा आणि नवा असल्याचे प्रेम चोप्रा सांगितले. तर, 'उड्नछू' चे दिग्दर्शन रविंद्र सिंग यांनी केले असून ह्या चित्रपटाची स्टोरी नेहमीच्या  हिंदी चित्रपटांसारखी नायक, खलनायक आणि बदला नसल्याचे रविंद्र सिंग सांगितले. 
पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारे प्रेम चोप्रा व्यक्तिगत जीवनात मात्र कमालीचे सदाचरणी आहेत. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.