Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 2: 'या' कारणामुळे वीणा-आरोहमध्ये आज होणार राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 13:06 IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसीसाठी उमेदवार निवडण्याचे बिग बॉस यांनी सदस्यांवर कार्य सोपावले होते.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसीसाठी उमेदवार निवडण्याचे बिग बॉस यांनी सदस्यांवर कार्य सोपावले होते.  या कार्यात सदस्यांमध्ये बरेच वाद विवाद झाले, मतभेद, भांडण झाली  आणि अखेर या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी दोन उमेदवार मिळाले. या आठवड्यामध्ये “म्हातारीचा बूट” हे कॅप्टनसी कार्य शिव आणि किशोरी शहाणे मध्ये रंगणार आहे.  आता हा टास्क सदस्य कसा पार पाडतील आणि घराचा कॅप्टन होण्याचा मान कोण पटकावणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

टास्क दरम्यान शिव आणि आरोहचा वाद होणार आहे... आरोह म्हणाला,”काही ताकद नाहीये त्याच्यामध्ये फुसका आहे तो”. वीणाचे म्हणणे पडले “दादागिरी नाही करायची”... आरोहचे म्हणणे आहे प्रत्येक टास्कमध्ये हेच होत, मी नाही खेळणार टास्क”.  बघूया पुढे काय होईल टास्कमध्ये.

 काल बिग बॉसच्या घरामध्ये अभिजीत बिचुकलेंना राग अनावर झाला होता त्यांचे म्हणणे होते की, “आता सुरुवात करणार आहे मी दिवसाची... इथे अन्न खाणार नाही मी, जोपर्यत ती व्यक्ति मला सॉरी म्हणत नाही. चॅलेंज आहे माझ... बिग बॉस यांनी सांगाव नाही तर माझे कपडे भरावे”... वीणाचे म्हणणे होते मी तुम्हाला कॉमप्लिमेन्ट दिली आहे, त्यावर अभिजीत बिचुकले म्हणाले, तुझं आणि माझं नाही आहे पण तुझ्याबद्दल मी बोलतोय ना चांगलं... तुझ्यासाठी केले आहे जगीराची स्टाईल... मेरे मन को भाया मै कुत्ता काटके खाया, मग ते सातारा असो, मुंबई असो वा महाराष्ट्र राज्य असो कुठल पण असो मला घेणे देण नाही...

 

टॅग्स :बिग बॉस मराठीवीणा जगतापशीव ठाकरे