Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅप्टन अमेरिका-सिव्हिल वॉर’मध्ये वरुणचा आवाज

By admin | Updated: April 21, 2016 01:43 IST

डिस्ने इंडिया आणि वरुण धवन यांच्यात नुकताच एक करार झाला असून, ‘कॅप्टन अमेरिका-सिव्हिल वॉर’च्या हिंदी चित्रपटात त्याचा आवाज वापरण्यात येणार आहे.

डिस्ने इंडिया आणि वरुण धवन यांच्यात नुकताच एक करार झाला असून, ‘कॅप्टन अमेरिका-सिव्हिल वॉर’च्या हिंदी चित्रपटात त्याचा आवाज वापरण्यात येणार आहे. वरुणचा आवाज स्टीव्ह रॉजर्स या मुख्य पात्रासाठी वापरण्यात येईल. वरुण केवळ आवाजच देणार असे नव्हे तर हॉलिवूड कॉस्च्युम्स आणि कॅप्टन आॅफ अमेरिका मधील पात्रांच्या प्रतिकृतींचे लाँचिंगही करणार आहे. ‘जेव्हा डिस्नेने मला कॅप्टन अमेरिका चित्रपटात आवाज देण्याविषयी विचारले, तेव्हा माझ्या डोक्यात विचार चक्र सुरू झाले. कोणत्याही अभिनेत्याला असा आवाज काढणे कठीण असते. कॅप्टन अमेरिका हे अत्यंत प्रगल्भ आणि संतुलित पात्र आहे. त्यामुळे हे माझ्यासाठी आणखी कठीण होते. हा चित्रपट भव्यदिव्य असून, यात जोरदार अ‍ॅक्शन्स आहेत. हा लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठीचा चित्रपट आहे. असे चित्रपट करणे हे मला खूप आवडते आणि मी त्याला आव्हान म्हणून स्वीकारतो’ असे वरुण म्हणाला. इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू या चार भाषांमध्ये कॅप्टन अमेरिका हा चित्रपट ६ मे रोजी भारतात प्रदर्शित होत आहे.