Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरुणचा हृतिक-कंगनाला टोमणा

By admin | Updated: April 20, 2016 02:18 IST

हृतिक-कंगनाच्या कोर्टात सुरू असलेल्या लढाईची चर्चा मस्त चवीने केली जातेय. यामध्ये वरूण धवननेसुद्धा उडी घेतली आहे. सोमवारी जॉन-वरुण-जॅकलिन स्टारर ‘ढिश्शूम’ या चित्रपटाची शुटिंग मुंबईत पूर्ण झाली. या

हृतिक-कंगनाच्या कोर्टात सुरू असलेल्या लढाईची चर्चा मस्त चवीने केली जातेय. यामध्ये वरूण धवननेसुद्धा उडी घेतली आहे. सोमवारी जॉन-वरुण-जॅकलिन स्टारर ‘ढिश्शूम’ या चित्रपटाची शुटिंग मुंबईत पूर्ण झाली. यानिमित्ताने एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी एका पत्रकाराने वरूणला हृतिक-कंगणाबद्दल विचारले. यावर उत्तर देण्याचे टाळण्याऐवजी या पठ्याने टोमणा मारला. तो म्हणाला, आमच्या चित्रपटाचे नाव ‘ढिश्शुम’ आहे, ‘ढिश्शूम ढिश्शूम’ नाही.’ वरूणचा हा टोमणा त्या दोघांना किती जिव्हारी लागतो हे येत्या काही दिवसांत कळेलच.