अभिनेता वरुण धवन तुरुंगात गेला आहे. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ मध्ये प्रशंसेचा मानकरी ठरलेला वरुण आगामी चित्रपट ‘बदलापूर’च्या शूटिंगसाठी नाशिक तुरुंगात गेला होता. त्याची काही छायाचित्रे लिक झाली आहे. यात वरुणने दाढी वाढवल्याचे दिसले आहे. तो काही महिला आणि लहान मुलांसोबत दिसला आहे. श्रीराम राघवनद्वारा दिग्दर्शित या चित्रपटात वरुणसोबत यामी गौतम आणि हुमा कुरेशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यामी वरुणची पत्नी झाली आहे. हुमा यौनकर्मीच्या भूमिकेत आहे. या थ्रिलर चित्रपटाची रिलिजिंग तारीख ठरवायची आहे.