Join us

'बद्रिनाथ की दुल्हनिया'मधून वरुण- आलियाची केमेस्ट्री पुन्हा पडद्यावर

By admin | Updated: November 9, 2016 21:00 IST

वरुण धवन आणि आलिया भट्ट यांची रोमँटिक केमेस्ट्री पुन्हा एकदा 'बद्रिनाथ की दुल्हनिया'मधून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - हंप्टी शर्मा की दुल्हनियानंतर आता वरुण धवन आणि आलिया भट्ट यांची रोमँटिक केमेस्ट्री पुन्हा एकदा 'बद्रिनाथ की दुल्हनिया'मधून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये खूपच आकर्षकरीत्या वरुण आणि आलियाची जोडी दिसत आहे. करण जोहरनं सेटवरचे काही फोटोही शेअर केले आहेत. चित्रपटाची शूटिंग सिंगापूरमध्ये सुरू आहे. याआधी चित्रपटाची शूटिंग राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक अरोरा आहेत. तर करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे. बद्रिनाथ की दुल्हनिया हा चित्रपट लव्ह स्टोरीवर आधारलेला आहे. चित्रपटात झांसीचे बद्रिनाथ यांची कहानी आहे. वरुण यानं हा चित्रपट 'हंप्टी शर्मा की दुल्हनिया'चा सिक्वल नसल्याचं सांगितलं आहे. याआधीही वरुण आणि आलियानं करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इअर'मध्ये काम केले होते. 'हंप्‍टी शर्मा की दुल्‍हानिया' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता 'बद्रिनाथ की दुल्हनिया' चित्रपटाची उत्कंठा लागून राहिली आहे.