Join us
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या व्हॅनिटी व्हॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 16:26 IST

चौवीस तास काम करणाऱ्या पोलिसांवरचा कामाचा ताण पाहाता शहरातील वॅनिटी व्हॅन मालकांनी त्यांची ही वॅन मुंबई पोलिसांच्या सेवेत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत जवळपास चार वॅनिटी व्हॅन पोलिसांच्या सेवेत देण्यात आल्या असून दहिसर, दिंडोशी, मालाड आणि घाटकोपर या भागांमध्ये या व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहाता महाराष्ट्र सरकारने अनेक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे पोलिसांचे काम प्रचंड वाढले आहे. चौवीस तास काम करणाऱ्या पोलिसांवरचा कामाचा ताण पाहाता शहरातील वॅनिटी व्हॅन मालकांनी त्यांची ही वॅन मुंबई पोलिसांच्या सेवेत देण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसांना त्यांच्या कामातून काही क्षणांची विश्रांती मिळावी तसेच कपडे बदलणं आणि शौचालयाच्या सुविधेसाठी या व्हॅनिटी व्हॅन देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जवळपास चार वॅनिटी व्हॅन पोलिसांच्या सेवेत देण्यात आल्या असून दहिसर, दिंडोशी, मालाड आणि घाटकोपर या भागांमध्ये या व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत. पुढील काळात पोलिसांच्या गरजेनुसार अधिकाधिक व्हॅनिटी व्हॅन त्यांना पुरवण्याचा विचार करण्यात आला आहे.

या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पोलिसांसाठी खूपच चांगले काम करण्यात आले असल्याचे हे फोटो पाहून नेटिझन्स सांगत आहेत. 

टॅग्स :मुंबई पोलीस