Join us  

'मीही हसत राहण्याचा प्रयत्न...' प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या हास्यकलाकार वनिता खरातची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 11:19 AM

इतरांना हसवणाऱ्या वनिता खरातची पोस्ट व्हायरल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून नावारुपाला आलेले सर्वच कलाकार आज स्टार झालेत. विनोदी शैली, उत्तम अभिनय, पहिल्याच मिनिटापासून प्रेक्षकांना पोट धरुन हसवायला लावणारी अशी ही हास्यजत्रेची टीम आहे. नुकतीच हास्यजत्रेची टीम अमेरिका दौरा करुन पुन्हा भारतात परतली आहे. दोन महिन्यांनंतर हास्यजत्रा पुन्हा सुरुही झाली आहे. दरम्यान हास्यजत्रा कलाकार वनिता खरातने (Vanita Kharat) सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलंय.

महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमसोबत अमेरिका दौऱ्यावर असतानाच वनिता खरातचा वाढदिवस होता. मोठ्या थाटात टीममधील सदस्यांनी तिचा वाढदिवस अमेरिकेत साजरा केला. या वाढदिवसाला ती नवऱ्यासोबत भारतात नव्हती. तरी नवऱ्यानेही तिचा वाढदिवस इतर नातेवाईकांसोबत साजरा केला. वनिता लिहिते, 'या वर्षीचा माझा वाढदिवस खूप विशेष होता,कारण दीड दिवस माझा वाढदिवस साजरा झाला तोही ३ देशांमध्ये अमेरिका , कॅनडा आणि भारत... तोही माझ्या लाडक्या माणसांबरोबर! इतक्या जल्लोषात आणि उत्साहात, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी बघत माझा वाढदिवस साजरा होईल असं खरंच वाटलं नव्हतं. प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद मला आज इथवर घेऊन आली, आणि माझ्या मित्रांनी या वाटेवर माझी सोबत केली. घरच्यांच्या शुभाशीर्वादाने मला मार्ग दाखवला आणि नाजूक क्षणात सुमितने माझा हात धरला! इतके प्रचंड देश पाहताना, तिथलं सौंदर्याने भारावून जाताना आणि प्रत्येक केक कापताना, सुमितची मात्र प्रचंड आठवण आली. मी तिथे असताना भारतात वाढदिवस साजरा करण्याची धुरा सुमितने सांभाळली, आणि शुभेच्छा ही माझ्यापर्यंत पोहचवल्या. या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मिळणार प्रेम द्विगुणित करण्याचा प्रयत्न करेन. जितकं हसवते आहे तितकाच मीही हसत राहण्याचा प्रयत्न करेन, सोबत तुम्ही असालच ही आशा बाळगून.

ता. क. - पुढच्या वाढदिवसाला बघुया कुठल्या देशात असेन! 

१९ जुलै रोजी वनिताने अमेरिकेतच आपला वाढदिवस साजरा केला होता. तर भारतात परतल्यावरही तिने पुन्हा वाढदिवस सेलिब्रेट केला. हास्यत्रेमुळे वनिताला एक वेगळी ओळख मिळाली. 'कबीर सिंग' या हिंदी सिनेमात तिने साकारलेली छोटीशी भूमिका कायम प्रेक्षकांच्या स्मरणार राहिली. 

टॅग्स :वनिता खरातमहाराष्ट्राची हास्य जत्रासोशल मीडियाटिव्ही कलाकार