Join us

VALENTINE WEEK : हॅप्पी टेडी डे, जाणून घ्या का गिफ्ट करतात टेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2017 13:53 IST

प्रेमोत्सव व्हेलेंटाईन वीकमधील आजचा चौथा दिवस म्हणजे 'टेडी डे'.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - प्रेमोत्सव व्हेलेंटाईन वीकमधील आजचा चौथा दिवस म्हणजे 'टेडी डे'.  या दिवशी तरुण-तरुणी एकमेकांप्रती असलेले प्रेम व्यक्त करुन प्रेमाची निशाणी म्हणून टेडी गिफ्ट करतात. महिला वर्गाला सॉफ्ट टॉय मोठ्या प्रमाणात आवडतात. टेडी बिअर नात्यात सॉफ्टनेस आणि क्युटनेस घेऊन येतो, असा समज प्रेमीयुगुलांमध्ये आहे.
(लव्ह मार्केटमध्ये भेटतात जुने प्रेमीयुगुल)
 
कोणत्याही रंगाचे किंवा कोणत्याही आकाराचे सॉफ्ट टॉय मुलींनी गिफ्ट केले तरी त्या हे गिफ्ट नाकारणार नाहीत, अगदी आनंदाने स्वीकारतील.  सध्या गिफ्ट करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. आपल्या पार्टनरला गिफ्ट करण्यासाठी तुम्ही एखादे टेडी प्रिटेंड टी-शर्ट किंवा अन्य प्रकारचे कपडेही गिफ्ट करू शकता. 
(‘या’ अभिनेत्रींनी साकारले ‘टेडी’सोबत आॅनस्क्रीन सीन्स!)
 
शिवाय टेडीचे डिझाईन असलेले उशी, किल्ली, छल्ला, कि-चेन अशा प्रकारचे गिफ्ट देऊ शकता. या वस्तू नेहमी तुमच्या पार्टनरच्या जवळही राहतील. किंवा एखाद्या बास्केटमध्ये फुलं, चॉकलेट, फुगे, कार्डसहीत एखादा सॉफ्ट टॉय देऊन तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत टेडी डे साजरा करा आणि हो... महत्त्वाचे म्हणजे दोघांमधील हसरे-आनंदाचे क्षण कॅमे-यात कैद करायला अजिबात विसरू नका....हॅप्पी टेडी डे !