Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैशाली माडेचा श्रेयासोबत ‘पिंगा’

By admin | Updated: November 27, 2015 02:19 IST

भाषा हा अडथळा ठरत नाही. विशेषत: जेव्हा तिचा वापर गाण्यामध्ये केला जातो... आता हेच पाहा ना, आजची किती तरी हिंदी गाणी अशी आहेत,

भाषा हा अडथळा ठरत नाही. विशेषत: जेव्हा तिचा वापर गाण्यामध्ये केला जातो... आता हेच पाहा ना, आजची किती तरी हिंदी गाणी अशी आहेत, ज्यामध्ये मराठी शब्दांचा वापर केला जात आहे... ही गाणी हिट ठरण्याचा टे्रंड वाढत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’मध्येदेखील ‘पिंगा’मधून मराठीचा बाज दाखविण्यात आला आहे. त्या गाण्यावरील वाद सोडला तर हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. महाराष्ट्रीयन नऊवारी साडी, पारंपरिक दागिने अशा आविर्भावात दीपिका-प्रियांकाची पावले पिंगावर थिरकत आहेत... त्यांचे नृत्य जसे मोहक आहे, तसेच श्रेया घोषाल आणि वैशाली माडे यांनी आपल्या मधुर सुरांमधून त्याला वेगळी उंची दिली आहे... मराठमोळ्या वैशालीच्या आवाजाची जादू रसिकांना या गाण्यात अनुभवास मिळत आहे.. सारेगमप चँलेंज २००९ स्पर्धेची विजेती वैशालीने मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटविल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यास ती सज्ज झालीये.