Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैदहीचा हा फोटो पाहून फॅन्स म्हणाले, निगाहें हटती ही नहीं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 07:15 IST

अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते.

अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदहीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

वैदहीने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. यात ती सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये ही खूप सुंदर दिसतेय. काही तासांच्यात आतच वैदहीच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

अभिनेत्री वैदही परशुरामीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून वैदहीने मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले.तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली.

रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. मुंबईत जन्म झालेल्या वैदेहीने विधी शाखेची पदवी घेतली आहे. यासह तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले आहे.  

टॅग्स :वैदेही परशुरामी