‘चीटर’ या सिनेमामध्ये आपल्याला एकदमच फ्रेश अन् इंडस्ट्रीतील टॉलेस्ट जोडी पाहायला मिळणार आहे अन् ती म्हणजे पूजा सावंत व वैभव तत्त्ववादी या दोघांची. मॉरिशसमधील एका हाँटेड व्हीलामध्ये घडणाऱ्या कथेचा हे दोघे भाग आहेत. यामध्ये वैभव एका चीटरची भूमिका करीत आहे अन् तो चीटर साधासुधा नाही, तर पुणेरी आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वैभव अन् पूजा यांनी नुकताच पुणे दौरा केला होता. या पुणे भेटीदरम्यान आपल्या वैभवला त्याच्यातील पुणेरी चीटर लपवता आला नाही. या वेळी पूजा व वैभवने या दोघांनीही ब्लॅक अँड व्हाईट असा अटायर केला होता. वैभवने व्हाईट टीशर्ट, तर आपल्या ब्यूटी क्वीन पूजाने ब्लॅक लाँग कुर्ता घातला होता. या ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये हे दोन चीटर एकदम जबरदस्त दिसत होते. लोकमत आॅफिसला दिलेल्या भेटीदरम्यान या दोघांचेही झक्कास फोटेसेशन करण्यात आले. याच फोटो गॅलरीमधील एक फोटो वैभव सोशल साईट्सवर अपलोड करून म्हणत आहे, ‘ब्लॅक अँड व्हाईट, नॉटी अँड नाईस... मीट द पुणेरी चीटर अँड लव्ह आॅफ हीज् लाईफ...’
वैभव म्हणतोय, ब्लॅक अॅण्ड व्हाइट.. नॉटी अॅण्ड नाईस
By admin | Updated: June 5, 2016 02:26 IST