Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बिग बॉसमध्ये जाणार हे तिने मला सांगितलं नव्हतं.."; उषा नाडकर्णींच्या मुलाचा मोठा खुलासा, म्हणाला-

By देवेंद्र जाधव | Updated: June 8, 2025 14:38 IST

उषा नाडकर्णींच्या मुलाचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे. या इंटरव्ह्यूमध्ये त्याने आईविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत

सध्या उषा नाडकर्णी त्यांच्या विविध मुलाखतींमुळे चर्चेत आहेत. उषा यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. उषा नाडकर्णींनी वयाची सत्तरी ओलांडली तरीही त्या मुलापासून एकट्या राहतात. उषा बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी फॅमिली वीकमध्ये उषा यांचा मुलगा अभिजीत पहिल्यांदाच सर्वांना दिसला. उषा जेव्हा बिग बॉसमध्ये होत्या त्यावेळी अभिजीतने मोठा खुलासा केला होता. "आईने मला बिग बॉसविषयी काही सांगितलं नव्हतं", असं अभिजीत म्हणाला होता. जाणून घ्या

बॉलिवूड स्पायला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतने ही गोष्ट सर्वांना सांगितली होती. अभिजीत म्हणाला की, "आईने मला सांगितलंच नव्हतं की, ती बिग बॉसमध्ये जाणार आहे. तिने मला सांगितलं की, मी तीन महिन्यांसाठी बाहेर जातेय. मी तिच्याकडून माहिती काढायचा प्रयत्न केला की, ती नेमकी कुठे जातेय. कोणता सिनेमा,  एखादा शो, नेमकी कुठे जातेय? पण तिने मला सांगितलंच नव्हतं. एक दिवस अचानक मी कलर्स बघत होतो तेव्हा बिग बॉस मराठीचा ट्रेलर पाहिला." 

"मी रात्रभर त्याविषयी विचार करत होतो. मी पूर्ण रिसर्च कळाल्यावर मला कळलं की, १०० दिवसांचा हा शो आहे म्हणजे जवळपास तीन महिने. तेव्हा मला समजलं की, आई तिकडे चाललीय. मी तिला खोदून विचारलं तेव्हा तिने सांगितलं की, ती बिग बॉसमध्ये जातेय."

"तेव्हा मी तिला विचारलं की, तुला खरंच हे करायचं आहे? कारण बिग बॉस हिंदीचा पहिला किंवा दुसरा सीझन मी बघितला होता त्यामुळे मला माहित होतं की, त्यात काय असतं. टास्क, तणाव अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या वयात आईने हा शो करणं हे मी स्वीकार करु शकत नव्हतो. त्यामुळे बिग बॉसमध्ये नको जाऊ, हे मी तिला सांगितलं होतं. पण एकदा तिने ठरवलं की ठरवलं. मग आपण काही नाही करु शकत."

 

टॅग्स :उषा नाडकर्णीबिग बॉसबिग बॉस मराठीमराठी अभिनेता