Join us
Daily Top 2Weekly Top 5

उषा नाडकर्णी कृष्णावर भडकल्या?

By admin | Updated: July 16, 2016 01:31 IST

काही दिवसांपूर्वी मिका सिंग, उपासना सिंग या दोघांनी ‘कॉमेडी नाईटस लाईव्ह’ या कार्यक्रमाला रामराम ठोकला. त्यानंतर गोविंदाने या कार्यक्रमात हजेरी न लावता

काही दिवसांपूर्वी मिका सिंग, उपासना सिंग या दोघांनी ‘कॉमेडी नाईटस लाईव्ह’ या कार्यक्रमाला रामराम ठोकला. त्यानंतर गोविंदाने या कार्यक्रमात हजेरी न लावता ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहकुटुंब हजेरी लावली होती. यावरून त्याचा भाचा कृष्णा अभिषेक चांगलाच खवळला होता. ही बातमी कित्येक दिवस मीडियात गाजत होती. ‘कॉमेडी नाईटस लाईव्ह’ हा कार्यक्रम नेहमीच चुकीच्या कारणांसाठी चर्चेत असतो. आणि आता उषा नाडकर्णी यांनी ही मालिका सोडली आहे. कृष्णा अभिषेकसोबत वाद झाल्यामुळे उषा नाडकर्णी यांनी हा कार्यक्रम सो़डलेला असल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमात उषा नाडकर्णी यांची व्यक्तिरेखा ज्याप्रकारे दाखवली जात होती, ते त्यांना पटत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते अशी सध्या चर्चा आहे.