Join us

उफ्फ! उर्फी जावेद ये तेरी अदा, बयेने प्लास्टिक गरम करून बनवला टॉप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 17:59 IST

उर्फी जावेद हीचे लेटेस्ट फोटो पाहिलेच पाहिजेत. या फोटोमध्ये तिच्या टॉपकडे सर्वांच लक्ष आकर्षित होत आहे. काय विशेष आहे या टॉपमध्ये हे तिनेच सांगितलंय.

सध्या गर्मीने कहर केलाय. तळपत्या उन्हापासून जो तो वाचण्याचा प्रयत्न करतोय. पण सध्या इंटरनेटचं वाढलेलं तापमान मात्र याची देही याची डोळा पाहण्याचा आनंद नेटकरी घेतायत. आता इंटरनेटचं तापमान वाढलं त्यात ते डोळ्यांनी कसं पाहायचं असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर तुम्ही उर्फी जावेद हीचे लेटेस्ट फोटो पाहिलेच पाहिजेत. या फोटोमध्ये तिच्या टॉपकडे सर्वांच लक्ष आकर्षित होत आहे. काय विशेष आहे या टॉपमध्ये हे तिनेच सांगितलंय.

उर्फी जावेद नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईलमुळे प्रसिद्ध आहे. अनेकदा ती तिच्या चित्रविचित्र ड्रेसेसमुळे फॅन्सचं लक्ष वेधुन घेते. आता तिने असाच एक टॉप घातलाय जो चर्चेचा विषय झालाय. उर्वी म्हणतेय हा टॉप तिने प्लास्टिक पासून तयार केलाय. कहर म्हणजे हा टॉप तिने शेगडीवर गरम करुन तयार केलाय. लावलात ना डोक्याला हात? पण हे उर्फीनेच तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर टाकलंय. आता हे खरंय कि खोटं हे तिलाच माहिती पण उर्फीच्या या गुलाबी रंगाच्या टॉपची चर्चा चांगलीच रंगलीय

असे काही विचित्र प्रयोग करायची काही उर्फीची पहिलीच वेळ नाही. याआधीही काहीतरी भन्नाट करत तिने मिडियाचं अन् चाहत्यांच लक्ष वेधुन घेतलंय.

टॅग्स :सेलिब्रिटी