Join us

श्रुतीचे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर

By admin | Updated: November 25, 2015 02:16 IST

श्रुती मराठे हे नाव तसं २०१३ वर्षाच्या आधीही मराठीच नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत घेतलं जात होतं. कारण तिने सनई चौघडे, असा मी तसा

श्रुती मराठे हे नाव तसं २०१३ वर्षाच्या आधीही मराठीच नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत घेतलं जात होतं. कारण तिने सनई चौघडे, असा मी तसा मी, लागली पैज, त्याचा बाप तिचा बाप हे मराठीतील तर इन्दिरा व्हिजा, गुरू शिष्यान, विदियाल या दाक्षिणात्य चित्रपटांत अभिनय केला आहे. पण तशी तिला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली ते राधा ही बावरी या मालिकेमध्ये. मग ती नायिकाप्रधान मालिका होती म्हणून का असेना; पण त्यानंतरच तिला मराठी इंडस्ट्रीत खऱ्या अर्थानं ब्रेक मिळाला आणि आता तर ती अनेक चित्रपटांतही दिसू लागली आहे. रमा माधव, मुंबई-पुणे-मुंबई २ या चित्रपटांत ती मालिकेनंतर परत दिसली; पण सेकंड लीड रोलमध्ये. मात्र आता तिचे २ चित्रपट येत आहेत बरं. गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित संघर्षयात्रा चित्रपटात त्यांची कन्या पंकजा मुंडेंची भूमिका श्रुती साकारत आहे. तर, दुसरा चित्रपट येत आहे बंध नायलॉनचे. या दोन्ही चित्रपटांत तिला लीड रोलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आता खरे तर श्रुती प्रसिद्धीच्या झोतात येणार, असं म्हणायला काही हरकत नाही.