अक्षय कुमारचा रुस्तम आणि हृतिक रोशनचा मोहन जोदडो यांच्यादरम्यान १२ आॅगस्ट रोजी जोरदार टक्कर होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही अभिनेते अद्याप यावर काही बोलले नाहीत. दरम्यान अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने यात उडी घेतली आहे. हृतिक रोशनने रुस्तमच्या ट्रेलरचे ट्विटरवर कौतुक केल्यानंतर ट्विंकलनेही दोन्ही चित्रपट चांगला व्यवसाय करतील आणि आपण दोघे याचे सेलिब्रेशन करु असे टिष्ट्वट केले आहे.रुस्तम चित्रपट टिनु सुरेश देसाई दिग्दर्शित करीत असून, अक्षय कुमार याने नौसेना अधिकारी रुस्तम पावरीची भूमिका केली आहे. आपल्या पत्नीच्या प्रियकराचा खून करणाऱ्या के. एम. नानावटी यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये इलिना डीक्रुझ आणि इशा गुप्ता यांच्याही भूमिका आहेत.
रुस्तम विरुद्ध मोहनजोदडोमध्ये ट्विंकलची उडी
By admin | Updated: July 2, 2016 03:17 IST