Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनाविरुद्ध जोडलं जाणार आशू-शिवाचं नातं; आशु करेल का शिवाचा पत्नी म्हणून स्वीकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 17:45 IST

Shiva: . लग्नासाठी दिव्या बाशिंग बांधून तयार असते. मात्र, तिच्या डोक्यात काही वेगळाच प्लॅन शिजत असतो.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिकांमध्ये लग्नसराई विशेष भाग सुरु आहेत. यामध्येच शिवा या मालिकेमध्येही आशु आणि दिव्याच्या लग्नाची गडबड सुरु आहे. लवकरच ही जोडी लग्नाच्या बंधनात बांधली जाणार असून त्यांच्या लग्नापूर्वीच्या फंक्शनला सुरुवातही झाली आहे. मात्र, ऐनवेळी या मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे. लग्नमंडपात दिव्याऐवजी शिवा उभी राहणार आहे. 

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये लग्नमंडपात सगळ्याची लगबग सुरु असते. लवकरच दिव्या आपली पत्नी होणार या विचाराने आशु खूश असतो. मात्र, शिवा तिचं दु:ख मनात ठेऊन हे सगळं उघड्या डोळ्याने पाहात असते. यामध्येच मालिकेत एक ट्विस्ट येतो. लग्नासाठी दिव्या बाशिंग बांधून तयार असते. मात्र, तिच्या डोक्यात काही वेगळाच प्लॅन शिजत असतो. दिव्या ऐन लग्नमंडपातून पळून जाणार आहे. पर्यायाने शिवाला आशुसोबत लग्न करावं लागतं.

मंडपात पै-पाहुणे आले असतांनाच दिव्या चंदनसोबत पळून जाते. त्यामुळे रामभाऊं ही परिस्थिती हाताळण्यासाठी शिवाचा हात आशुच्या हातात देता. नाईलाजाने शिवा आणि आशु यांना एकमेकांशी लग्न करावं लागतं. एकीकडे शिवाला तिचं पहिलं प्रेम मिळत. मात्र, अचानक शिवासोबत झालेल्या लग्नामुळे आशु नाराज आहे.

दरम्यान, लग्न झाल्यानंतर रमाई शिवा तिचा सून म्हणून स्वीकारण्यास नकार देते. इतकंच नाही तर ती शिवाचा गृहप्रवेशदेखील होऊ देत नाही. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा सामना शिवा कसा करणार?, आशू तिची साथ देईल का?, दिव्याचं सत्य समोर येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेता