Join us

अखेर यशने घेतला नेहाच्या आयुष्यातून जाण्याचा निर्णय? दोघांच्या नात्यात येणार कायमचा दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 17:55 IST

Mazi tuzi reshimgath: सध्या यश आणि नेहा यांच्यात शीत युद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून यश सातत्याने नेहाचं मन जिंकायचा प्रयत्न करतोय.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत दिवसेंदिवस उत्कंठा वाढवणारे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे दररोज या मालिकेत काय नवीन पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या यश आणि नेहा यांच्यात शीत युद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून यश सातत्याने नेहाचं मन जिंकायचा प्रयत्न करतोय. मात्र, नेहा काही केल्या त्याचं ऐकून घ्यायला तयार नाही. अखेर यशने नेहाच्या आयुष्यातून कायमचं जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या सोशल मीडियावर यश आणि नेहा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात माझ्या बालिशपणामुळे, माझ्या हट्टामुळे तुला खूप त्रास झालाय. पण मी वचन देतो यापुढे माझ्यामुळे तुला कोणताही त्रास होणार नाही. तसंच कंपनीने एक निर्णय घेतलाय. की तुला वाटेल तेव्हा तू कंपनी सोडून जाऊ शकतेस,असं यश नेहाला सांगतो.

दरम्यान, यशचं सत्य समजल्यानंतर नेहाने त्याच्याशी असलेली मैत्री तोडून टाकली आहे. मात्र, तरीदेखील तिच्या संकट काळात तो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं पाहायला मिळालं. परंतु, तरीदेखील नेहा त्याची बाजू ऐकून घेण्यास तयार नाही. म्हणूनच, अखेर यशने तिच्या आयुष्यातून कायमचं निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारश्रेयस तळपदे