Join us

टीव्ही क्वीन एकता कपूर महाकुंभात पोहोचली, त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:59 IST

महाकुंभ मेळा १४४ वर्षांत एकदा आयोजित केला जातो.

Ektaa Kapoor Maha Kumbh 2025: देशभरात प्रयागराज येथील कुंभमेळ्याची चर्चा असून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी जात आहेत. त्यामध्ये, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वसामान्य नागरिक व सेलिब्रिटींचाही उत्साह दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या स्टार्सनी महाकुंभात स्नान केलं आहे. आता टीव्ही क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरलाही (Ekta Kapoor) हे सौभाग्य लाभलं आहे. 

एकता कपूरनं अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याची  झलक दिसून येत आहे.  महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर कोट्यवधी भाविक पवित्र स्नान करत आहेत.  एकता कपूरनही या त्रिवेणी संगमात प्रवित्र स्नान केलं आहे. या अध्यात्मिक प्रवासाचा ती वेळ पूर्णपणे आनंद घेताना दिसली. 

एकता कपूर जेवढी उत्तम दिग्दर्शिका आणि निर्माती आहे. तेवढीच तिची अध्यात्मिक बाजू देखील खास आहे. एकता कपूर ही कायम वेगेवगळ्या देव स्थांनाना भेट देताना दिसते. तिची मुंबईतील सिद्धिविनायकावर प्रचंड श्रद्धा आहे. दरवर्षी ती वाढदिवसाला सिद्धिविनायकाचं दर्शन घेते. यात तिनं खंड पडू दिलेला नाही. तसेच एकता कपूरची महादेवावरही आस्था आहे. एकता नेहमीच उज्जैनला पूजा करण्यासाठी जात असते. एकताने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक टाॅप मालिकांची निर्मिती केलीये. ती सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी व तुषार कपूरची बहीण आहे. 

दरम्यान, : हिंदू धर्मात, कुंभ मेळ्याचं वेगळं धार्मिक महत्त्व आहे. या महाकुंभ मेळ्याची सुरुवात १३ जानेवारी रोजी सुरु झाली. तर हा २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत असणार आहे. महाकुंभ मेळा १४४ वर्षांत एकदा आयोजित केला जातो. २०२५ नंतर पुढचा महाकुंभ २१६९ मध्ये होणार आहे.

 

टॅग्स :एकता कपूरकुंभ मेळा