Join us
Daily Top 2Weekly Top 5

रश्मि देसाई या आजाराने त्रस्त, त्यामुळेच झाली तिची अशी अवस्था

By सुवर्णा जैन | Updated: September 21, 2020 12:13 IST

टीव्ही अभिनेत्रींमध्ये क्युट अभिनेत्री म्हणून रश्मिला ओळखले जायचे.मात्र सध्याचे फोटो बघून नेमके झाले तरी काय असेच प्रश्न निर्माण होत आहेत.

इतर सेलिब्रेटींप्रमाणे टीव्ही अभिनेत्री रश्मि देसाई सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती सुरुवातीपासून आपले फोटो शेअर करत आली आहे. सुरुवातीचे रश्मिचे फोटो आणि आताचे फोटो पाहिले तर तिच्यामध्ये आलेला बदल तुम्हालाही सहज लक्षात येईल. गेल्या काही महिन्यांत  शेअर केलेल्या सोशल मीडियावरील अनेक फोटोंमध्ये ती गोलमटोल असल्याचे पाहायला मिळत आहे. अधिक फिट आणि मेंटेन तसंच बोल्ड, ग्लॅमरस दिसण्याच्या नादात रश्मि देसाई आता अशी दिसू लागली असल्याचेही अनेकांना वाटत आहे. चेह-यावरची चमकही नाहीशी झाली आहे. टीव्ही अभिनेत्रींमध्ये क्युट अभिनेत्री म्हणून रश्मिला ओळखले जायचे.मात्र सध्याचे फोटो बघून नेमके झाले तरी काय असेच प्रश्न निर्माण होत होते.

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार गेल्या काही महिन्यांपासून रश्मिला सोरायसिसचा त्रास होत आहे. याच कारणामुळे तिने घरातून बाहेर निघणेच बंद केले होते. तिचे वजनही वाढले होते. त्वचेला जराही उष्णता  लागू नये म्हणून तिने घरातच राहणे पसंत केले होेत. यावर सध्या ती उपचार घेत आहे.  ही समस्या ताणतणावामुळे जास्त वाढते. या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये दिसण्याला अधिक महत्त्व असते कलाकारासाठी चेहराच सर्वकाही असतो.

कोणत्याही गोष्टीमुळे तणाव येणार नाही. या सगळ्यांंपासून लांब राहिले तर रिलॅक्स राहता येईल. त्यामुळे फक्त स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त होते. सोरायसिसमुळे तब्येत खराब झाली होती. आता तब्येतीत थोडी सुधारणा होत आहे.  तसेच वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने म्हटले आहे.

 

करिअर पिकवर असताना रश्मीने अभिनेता नंदीश संधूसोबत केले होते लग्न !

'बिग बॉस १३' मध्ये रश्मि सहभागी झाली होती. शोमधून बाहेर पडल्यानंतर तिच्यात कमालीचा बदल तिने केला होता. क्युट दिसणारी रश्मि अचानक बोल्ड लूक मध्ये पाहायला मिळाली होती. 'उतरन’ या मालिकेतील तिने साकारलेली तप्पूची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. हिंदी मालिकांसह रश्मीने भोजपुरी, असामी, गुजराती चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. करिअर पिकवर असताना रश्मीने अभिनेता नंदीश संधूसोबत लग्नगाठ बांधली. ‘उतरण’ या मालिकेच्या सेटवर रश्मी व नंदीश जवळ आलेत आणि दोघांत प्रेम फुलले. पुढे दोघांचे लग्न झाले. करिअर पिकवर असताना रश्मीने अभिनेता नंदीश संधूसोबत लग्नगाठ बांधली. मात्र लग्नाच्या चार वर्षांनंतर रश्मी आणि नंदीश विभक्त झालेत.

दुस-यांदा रश्मि पडली प्रेमात, गेल्या काही दिवसांपासून रंगल्या अफेअरच्या चर्चा !

रश्मिनंतर अभिनेता अरहान खानच्या प्रेमात पडली होती. टीवी अभिनेता प्रिंस नरूला आणि युविका चौधरीच्या लग्नात रश्मि अरहानसह आली होती.  दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं या दोघांच्या  अफेयरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली असं समजावं असं सांगत रश्मिने तिच्या या अफेअरबाब अप्रत्यक्ष कबुलीच दिली होती. 

टॅग्स :रश्मी देसाई