Join us  

'Don 3 मध्ये काम करायचंय...' टीव्ही अभिनेत्याने थेट दीपिकालाच केला मेसेज; रिप्लाय आला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:47 PM

दीपिका पदुकोणच्या रिप्लायने जिंकलं चाहत्यांचं मन

फरहान अख्तरने (Farhan Akhtar) काही दिवसांपूर्वीच 'डॉन 3' (Don 3) ची घोषणा केली. डॉन फ्रँचायझीमधील पुढील सिनेमात आता शाहरुख खान दिसणार नाही म्हणल्यावर चाहते नाराज झाले. मात्र किंग खानने स्वत:च डॉनच्या पुढील भागांमध्ये काम करण्यास नकार दिला. यासोबतच फरहान अख्तरने रणवीर सिंह (Ranveer Singh) 'डॉन' असणार असल्याचं जाहीर केलं. यामुळे रणवीरच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. रणवीरचे नाव जाहीर होतच एका टीव्ही अभिनेत्याने थेट दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) मेसेज करत 'डॉन 3'मध्ये व्हिलनची भूमिका साकारायची असल्याची इच्छा व्यक्त केली. यावर दीपिकाने उत्तरंही दिलं.

रणवीर सिंह 'डॉन 3' मध्ये काम करणार या चर्चा आधीपासून सुरुच होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं. टीव्ही अभिनेता करणवीर (Karanveer Bohra) बोहराने दीपिकाला मेसेज केल्याचं समोर आलं. डॉन ३ मध्ये व्हिलनची भूमिका करायची इच्छा त्याने व्यक्त केली. यावर दीपिकाचा काय रिप्लाय आला हेही त्याने सांगितलं आहे.

अभिनेता करणवीर बोहरा एका मुलाखतीत म्हणाला,'जेव्हा मला कळलं की रणवीर सिंह डॉन ३ करणार आहे तेव्हा मी खरंच त्याच्या अपोझिट व्हिलनची भूमिका साकारायची इच्छा झाली. पण मी फरहान अख्तर किंवा त्याच्या प्रोडक्शनशी जोडलेल्या कोणाही व्यक्तीला ओळखत नव्हतो. म्हणून मी काहीही विचार न करता दीपिकाला मेसेज केला. म्हणलं प्रयत्न करायला काय हरकत आहे. कारण कधी काय होईल आपल्याला माहित नाही. मी आणि दीपिका एकमेकांना ओळखतो. म्हणूनच मी सिनेमात काम करण्याची इच्छा तिच्याकडे व्यक्त केली.'

दीपिकाने काय उत्तर दिलं?

करणवीर पुढे म्हणाला, 'तिने माझ्या मेसेजला उत्तर दिलं. ती म्हणाली, मी यात तुझी काही मदत करु शकत नाही. पण मी त्यांचा नंबर शेअर करते जे संबंधित बॅनरखाली तयार होणाऱ्या फिल्म्ससाठी कास्टिंग करतात.'

आश्चर्य म्हणजे दीपिकाने शेअर केलेला तो नंबर माझ्याकडे आधीपासून होता. मी त्या नंबरवर मेसेज करत लिहिले की माझ्यायोग्य एखादी भूमिका असेल तर सांगा.'असंही करणवीरने मुलाखतीत सांगितलं. सध्या करणवीर 'हम रहे ना रहे हम' मालिकेत व्हिलनच्या भूमिकेत आहे. करणवीर नेहमी त्याच्या गोंडस मुलींमुळे चर्चेत असतो.

टॅग्स :करणवीर बोहरादीपिका पादुकोणरणवीर सिंगफरहान अख्तरबॉलिवूडटिव्ही कलाकार