Join us
Daily Top 2Weekly Top 5

जणू ह्रतिक-अमिषा! थायलंडच्या बिचवर अक्षरा-अधिपतीने रिक्रिएट केला 'कहों ना प्यार हैं' चा सीन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 15:43 IST

झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे.

Tula Shikvin Changlach Dhada : झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. गेली दीड वर्ष ही मालिका प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. सध्या मालिका विश्वात शर्मिष्ठा राऊत निर्मित या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता ऋषिकेश शेलार यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. अभिनेत्री शिवानी रांगोळेने मालिकेत अक्षरा तर ऋषिकेश शेलारने अधिपती नावाचं पात्र साकारलं आहे. प्रेक्षकांनी या जोडीला अक्षरश: डोक्यावरच घेतलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अक्षरा-अधिपतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

दरम्यान, 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत नवा सिक्वेन्स पाहायला मिळत आहे. मालिकेत अक्षरा आणि अधिपती आता हनिमूनला थायलंडमध्ये गेल्याचं दाखवण्यात आलं आहे. यापूर्वी शिवानी रांगोळेने सोशल मीडियावर परदेशातील फोटो शेअर करत चाहत्यांना माहिती दिली होती. त्यात आता अक्षरा-अधिपतीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या मालिकेची संपूर्ण टीम फुकेतमध्ये रवाना झाली आहे. 

सध्या सोशल मीडियावर मास्तरणीबाईंसह अधिपतीचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ह्रतिक रोशन आणि अमिषा पटेल यांचा 'कहों ना प्यार हैं' या सिनेमातील समुद्रकिनाऱ्यावरील सीन रिक्रिएट केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये अक्षरा-अधिपती एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहेत. 

मास्तरीणबाईंनी या व्हिडीओमध्ये पांढरा वनपीस घातला आहे. तर अधिपतीने पांढरा शर्ट आणि पॅंट परिधान केली आहे. शिवानी रांगोळे आणि ऋषिकेशच्या या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते आहे. या व्हायरल व्हिडीओवर एका नेटकऱ्याने "सुरूवातीला बघितल्यावर ह्रतिक-अमिषाच वाटले, एक नंबर" अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने "अर्रारारारा.. खतरनाक... मला एकदम पहिल्यांदा बघितल्यावर दोन तीन सेकंद वाटलं की खरंच 'कहों ना प्यार हैं' हृतिक अमिषाच गाणं आलं, स्क्रोल करता करता" असं लिहित आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :शिवानी रांगोळेटिव्ही कलाकारथायलंडसोशल मीडियासोशल व्हायरल